नवी दिल्ली –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बातकार्यक्रम ३ महिन्यांसाठी बंद राहणार आहे.आज झालेल्या ‘मन की बात
कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सांगितले की, ‘मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे पुढील 3 महिने ‘मन की बात` कार्यक्रम होणार नाही. परिणामी मला या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधता येणार नाही.पुन्हा जेव्हा आम्ही तुमच्याशी ‘मन की बात’ मध्ये संवाद साधेन, तेव्हा तो ‘मन की बात’चा १११ वा भाग असेल. पुढच्या वेळी, १११ या शुभ अंकाने ‘मन की बात’ सुरू करण्यापेक्षा चांगले काय असू शकते. मन की बात थांबत आहे. मात्र देशाची प्रगती थांबणार नाही.
२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यावर मोदींनी मन की बात कार्यक्रम सुरू केला होताय या कार्यक्रमातून ते देशवासीयांशी संवाद साधतात. या कार्यक्रम २२ भारतीय भाषा आणि २९ बोली भाषा आणि ११ परदेशी भाषांमधून प्रसारित होतो.