नवी दिल्ली – देशात विमान कंपन्यांना दररोज येणाऱ्या धमक्यांचे सत्र थांबायला तय़ार नाही. आज ८५ विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यामध्ये इंडिगोची २० विमानं, एअर इंडियाची २०, विस्ताराची २० आणि अकासा एअरलाइन्सची २५ अशी ८५ विमानांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या आठ दिवसात ९० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. त्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
या धमकी प्रकरणात आत्तापर्यंत आठ वेगवेगळो एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दिल्लीहून देशातल्या विविध ठिकाणी जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय विमानांना ही धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचा साबयर सेल विभाग सध्या या प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवून आहे. एक्स आणि सोशल मीडियाचा वापर करुन विमाने उडवण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. एका आठवड्यात १७० हून अधिक विमाने उडवण्याच्या धमक्या आल्या आहेत.