अफगाणिस्तानात भूकंपाचे तीव्र धक्के

काबूल

अफगाणिस्तानमधील फैजाबाद येते आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. याचे केंद्र हिंदुकुशमध्ये जमिनीपासून सुमारे २२० किलोमीटर खाली होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.

या भूकंपाचे हादरे उत्तर भारत, दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील पीर पांचाळ परिसरात, तसेच पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि खैबर पख्तूनख्खा शहारांना देखील जाणवले. या भूकंपात कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे धक्के जाणवताच घरातील लोक आणि कार्यालयात काम करणारे कर्मचारी बाहेर पडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top