अभिनेत्री हेमा चौधरी रुग्णालयात दाखल

बंगळुरु

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमा चौधरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हेमा यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगितले जात आहे. हेमा यांना बंगळुरुच्या बॅप्टिस्ट रुग्णालाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. उपचारांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे हेमा यांच्या कुटुंबियांसोबतच चाहत्यांमध्येदेखील निराशा पसरली आहे.

हेमा यांनी अलीकडेच लीलावती पुण्यतिथी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्या पूर्णपणे तंदुरुस्त दिसत होत्या. हेमा यांनी कन्नड चित्रपटांसोबतच तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत १८० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. कुचीपुडी कलाकार म्हणूनही त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. १९७६ मध्ये त्यांनी ‘पेल्ली कानी पेल्ली’ या तमिळ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. याआधी त्या सहाय्यक भूमिकेत दिसल्या होत्या. ‘विजयवानी’, ‘दीपा’ आणि ‘गली माथू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या नकारात्मक भूमिकांद्वारे त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. हेमा यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top