अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये ‘मेड इन इंडिया’ सायकल

वॉशिंग्टन

अमेरिकेतील मोठ्या शॉपिंग मॉल चेन असणाऱ्या वॉलमार्टमध्ये आता ‘मेड इन इंडिया’ सायकल मिळणार आहेत. अमेरिकेमधील भारताचे राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते या सायकलींचे लाँचिंग करण्यात आले. दरम्यान संधू यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मेक इन इंडिया, मेक फॉर दि वर्ल्ड! वॉलमार्टमध्ये अमेरिकेतील पहिल्या भारतीय बनावटीच्या सायकलच्या लाँचिंगला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हिरो कंपनीने लुधियानामध्ये या सायकल बनवल्या आहेत”.

वॉलमार्टने यापूर्वीच मेड इन इंडिया सायकलींबाबत माहिती दिली होती. अमेरिकेतील काही ठराविक वॉलमार्ट दुकानांमध्येच या सायकल उपलब्ध आहेत. महिला आणि पुरूष दोघांसाठी वेगवेगळे मॉडेल उपलब्ध करण्यात आले आहेत. ‘क्रूझर स्टाईल’ प्रकारची ही सायकल आहे. वॉलमार्ट मेक इन इंडिया अभियानाला पाठिंबा देत आहे. हिरो कंपनीसोबतच अन्य काही कंपन्या देखील वॉलमार्टसोबत करार करण्याच्या प्रयत्नात आहेत. २०२७ पर्यंत भारतातून अमेरिकेत वार्षिक १० बिलियन डॉलरची निर्यात करण्याचे देशातील कंपन्यांचे लक्ष्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top