अमेरिकेवरील शटडाऊनचे संकटतूर्त टळले! अखेरच्या तासात निधी मंजूर

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेने शनिवारी अत्यंत नाट्यमयरित्या अखेरच्या काही तासांमध्ये अत्यावश्यक खर्चाशी संबंधित विधेयक मंजूर केले आणि अमेरिकेवरील शटडाऊनचे संकट तूर्त तरी लांबणीवर पडले. हे विधेयक स्वाक्षरीसाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. या बिलामुळे १७ नोव्हेंबरपर्यंत सरकारला निधी मिळणार आहे.
३३५ विरुद्ध ९१ मतांनी हे विधेयक पारित झाले. यामुळे फेडरल सरकारला ४५ दिवसांपर्यंत निधी मिळणार आहे. या बिलामुळे आता युक्रेनला दिली जाणारी अमेरिकेची मदत घटणार आहे. जीओपी खासदारांनी या निधीला तीव्र विरोध केला. पण फेडरल आपत्ती निधीसाठी प्राधान्याने १६ अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे.
सरकारला निधी देण्यासाठी मुदत संपणार असल्याने सिनेट सदस्यही विकेंड असूनही शनिवार-रविवारच्या सत्रासाठी उपस्थित होते. सिनेट सभापती केविन मॅकॉर्थी म्हणाले की आम्ही आमचे काम करणार आहोत. अमेरिकेतील फेडरल सरकारला दर वित्तीय वर्षात संसद ४३८ सरकारी संस्थांसाठी निधी वितरित करते. हे वित्तीय वर्ष ३० सप्टेंबरला संपते. जर काल हे बिल मंजूर झाले नसते तर सरकारी संस्थांना निधी मिळाला नसता आणि शटडाऊन झाला असता.१९८१ नंतर आतापर्यंत १४ वेळा अमेरिकेवर शटडाऊनची परिस्थिती ओढवली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top