नवी दिल्ली – विस्तारा एअरलाईन्सचे एअर इंडिया समुहात विलिनीकरणाच्या योजनेचा एक भाग म्हणून सिंगापूर एअरलाईन्सच्या ौएअर इंडिया समुहात २,०५८.५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे..थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) धोरणाच्या माध्यमातून सिंगापूर एअरलाईन्सने एअर इंडिया समुहात ही गुंतवणूक केली आहे.विस्तारा-एअर इंडिया विलिनीकरणानंतर एअर इंडिया समुह जगातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी म्हणून उदयास येणार आहे.विलिनीकरणानंतर सिंगापूर एअरलाईन्सची एअर इंडियामध्ये २५.१ टक्के भागीदार असणार आहे.सिंगापूर एअरलाईन्सच्या थेट परकीय गुंतवणुकीस मंजुरी मिळणे हा विलिनीकरणाच्या मार्गातील महत्वाचा टप्पा मानला जात आहे. या वर्षअखेरपर्यंत विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
