एलन मस्कचा ट्विटरचा राजीनामा नवे सीईओपद महिलेला मिळणार

सॅनफ्रान्सिस्को- एलन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. आता ट्विटरसाठी नवीन सीईओ म्हणून एक महिला कार्यभार सांभाळणार आहे. मस्क यांनी अद्याप नव्या सीईओंच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र एक महिला सीईओपदावर असल्याचे एलन मस्क यांनी सूचित केले आहे.

एलन मस्क यांनी ट्वीट करत सांगितले की, ट्विटरसाठी नव्या सीईओंची निवड केल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. येत्या सहा आठवड्यांत त्या पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अशी असेल. मस्क यांची जागा लिंडा याकरिनो घेऊ शकतात, अशी सध्या चर्चा आहे.

एलन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतले आणि तेव्हापासून ते त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ट्विटरला कायमस्वरूपी सीईओ नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, नवा सीईओ आल्यानंतर त्यांची भूमिका बदलेल.आपल्याला कोणत्याही कंपनीचे सीईओ व्हायचे नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top