काळाचौकीत २० डिसेंबर पासून दत्तजयंती नामजप यज्ञ सप्ताह

मुंबई – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ काळाचौकी केंद्राच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही २० ते २७ डिसेंबरदरम्यान काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील मंगलमूर्ती हाऊसिंग सोसायटी शेजारच्या पटांगणात दत्तजयंती नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे.

त्यानिमित्त रोज दिवसभरात त्रिकाळ आरती,७ दिवस विशेष याग,श्री स्वामी चरित्र सारामृत,श्री दुर्गा सप्तशती, औदुंबर प्रदिक्षिणा, नित्यधान,विष्णु सहस्त्रनाम वाचन होईल.त्याचप्रमाणे १७ डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य पालखी सोहळा पार पडणार आहे.या सप्ताह सोहळा व पालखी सोहळ्याला सर्व श्री स्वामी समर्थ भक्तगणांनी उपस्थित राहावे,असे
आवाहन अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ, काळाचौकी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top