कॅनडातील चिनी राजदूताने ५ वर्षांनंतर पद साेडले

ओटावा

कॅनडामधील चीनचे राजदूत कांग पेईवू यांनी आपले पद सोडले. सुमारे ५ वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. चीन आणि कॅनडामधील वाढत्या तणावमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. राजदूतपद सोडल्यानंतर कांग पेईवू चीनला परतले आहेत. याबाबत ओटावा येथील चिनी दूतावासाने कोणतेही भाष्य केले नाही.

२०१९ साली कांग पेईवू यांची चीनचे राजदूत म्हणून निवड करण्यात आली होती. पेईवू यांनी राजदूतपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी चीन व कॅनडा यांच्यातील संबंध तणावाचेच हाेते. मात्र आता हा तणाव वाढला आहे. कॅनडा चीनशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. २०१८ मध्ये चिनी कंपनी हुवावेईचे वित्त अधिकारी मेंग वाेनझाेऊ यांना आर्थिक घाेटाळ्याच्या आराेपाखाली अटक झाली हाेती. त्यानंतर चीनमध्ये कॅनडाचे नागरिक-मायकल स्पावर व मायकल काेव्हरिग यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईकडे वाेनझाेऊ यांच्या अटकेचा सूड म्हणून पाहिले जात होते. या घटनेमुळे चीन व कॅनडा यांच्यातील तणाव वाढला. आता कॅनडाच्या निवडणुकीत चीनच्या संभाव्य हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. याच वाढत्या तणावामुळे कांग पेईवू यांनी आपले पद सोडल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top