कोकणतील काशी कुणकेश्वर मंदीर आज २१ हजार दिव्यांनी उजळणार

देवगड – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात उद्या मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी भव्य दीपोत्सव आयोजित केला आहे. यावेळी २१ हजार दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे.

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्यावतीने प्रतिवर्षी दीपावली पाडवा या दिवशी हा दीपोत्सव साजरा केला जातो. यंदा उद्या १४ नोव्हेंबरला हा दीपोत्सव होत असून त्यानिमित्ताने मंदिर व मंदिर परिसरामध्ये २१ हजार दिव्यांची आरास केली जाणार आहे.तसेच विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारल्या जाणार आहेत. यादिवशी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत स्वर् निषाद मुंबई प्रस्तुत सुमधुर गाण्यांची मैफिल हा सांज संगीताचा कार्यक्रम होणार असून त्याचे मुख्य संकलन हेमंत कुमार तवटे यांचे असून यात गायक हर्ष नकाशे,सागर कुडाळकर,गायक नयन हार्प, ऍड सिद्धी परब सहभागी होणार आहेत. निवेदन अक्षय सातार्डेकर हे करणार आहेत.तसेच सायंकाळी ६.३० वाजता मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल. तसेच रात्री ८.३० ते ९ या वेळात सन्मान सोहळा व त्यानंतर ९ ते ९.३० या वेळात पालखी प्रदक्षिणा सोहळा होणार आहे तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top