गुगलचे नवीन फिचर आता इंग्रजी बोलायला शिकवणार

वॉशिंग्टन

गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन आता गुगल वापरकर्त्यांना इंग्रजी बोलायला शिकवणार आहे. यासाठी गुगल एक नवीन फीचर आणत आहे. या फीचरचे नाव ‘स्पीकिंग प्रॅक्टिस’ असे आहे. हे नवीन फीचर सध्या अर्जेटिना, कोलंबिया, भारत, इंडोनेशिया, मेन्सिको आणि व्हेनेझुएला व सर्च लॅबमधील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

एक अमेरिकन वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली की, हे नवीन फीचर वापरकर्त्यांना इंग्रजी भाषा शिकण्याची संधी देईल. या नवीन फीचरच्या साहाय्याने दैनंदिन जीवनात वापरले जाणारे शब्द शिकण्यास वापरकर्त्यांना मदत होईल. या फीचरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चॅटबॉट असण्याची शक्यता आहे. एआय चॅटबॉटच्या मदतीने वापरकर्त्यांचे इंग्रजी सुधारेल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्ते दररोज नवीन शब्द आणि त्यांचा वापर कसा करावा हे सहज समजू शकतील. ज्यामुळे त्यांची भाषा सुधारेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top