चंद्राबाबू नायडू यांना अंतरिम जामीन मंजूर

अमरावती :

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देशम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने कौशल्य विकास प्रकरणात त्यांना चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

चंद्राबाबू आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असताना २०१४ ते २०१९ या कालावधीत घडलेल्या कथित कौशल्य विकास घोटाळ्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. २०१९ मध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी चंद्राबाबूंना सातत्याने लक्ष्य केले आणि अटकही केली. त्यांच्या विरोधात आतापर्यंत दहा विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचा मुलगा लारा लोकेश यांच्यावरही १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top