चीनचा हेर समजून अटक केलेल्या कबुतराची कोठडीतून निर्दोष सुटका!

मुंबई- आठ महिन्यांपूर्वी चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी एका कबुतराला ते चीनचा हेर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. अखेर आता या कबुतराची पोलिसांच्या कोठडीतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी १७ मे रोजी चेंबूरमधील आरसीएफ पोलिसांनी पीर पौळ या रासायनिक प्रकल्पाच्या जेट्टीवर हे कबुतर आढळले होते. या कबूतरांच्या पायाला दोन धातूची वळी होती.एक तांबे आणि एक ॲल्युमिनियमचे होते. त्याच्या दोन्ही पंखांच्या खालच्या बाजूला चिनी लिपीत लिहिलेले काही गुप्त संदेश आढळले होते.यामुळे पोलिसांचा संशय वाढला होता. वळी फॉरेन्सिक चाचणीसाठी नेण्यात आली,तर कबुतराला तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते.तेव्हापासून हे कबुतर परळ येथील बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल या पशुप्राण्यांच्या रुग्णालयाच्या कोठडीत ठेवले होते.पण आता असे उघडकीस आले आहे की,हे कबूतर तैवानमधील शर्यतीत भाग घेत होते.अशाच एका कार्यक्रमात ते देशाबाहेर पाठवण्यात आले होते. मात्र, ते भरकटले आणि भारतात उतरले.आता ते चीनचे हेर नसल्याची खात्री पटल्यामुळे त्याच्यावरील हेरगिरीचे आरोप वगळण्यात आले आहेत.त्यामुळे आता त्याची तब्येत ठीक असल्याची खात्री करून त्याची मुक्तता करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top