जपानच्या समुद्रात कोसळले अमेरिकेचे लष्करी विमान

टोकियो- जपानच्या याकुशिमा बेटाजवळ समुद्रात एक अमेरिकन लष्करी विमान कोसळल्याची घटना घडली आहे.अमेरिकन लष्कराचे व्ही- २२ ओस्प्रे हे अपघातग्रस्त विमान असून यामध्ये ८ जण होते.जपानी तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानातील लोकांच्या सुरक्षेसह या घटनेबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

स्थानिक वेळेनुसार दुपारी २.४७ वाजता हा अपघात झाला. हे विमान समुद्रात कोसळताच त्याच्या डाव्या इंजिनमधून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. या भागातील अमेरिकन लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की,ते अद्याप या घटनेसंबंधी अधिक माहिती घेत आहेत. जपानमधील अमेरिकन लष्कराच्या प्रवक्त्यानेही यावर अद्याप काहीही सांगितलेले नाही.दरम्यान,या भागात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना तीन लोक जिवंत असल्याचे आढळून आले आहे.तटरक्षक दलाने या भागात गस्ती नौका आणि विमाने पाठवली आहेत.अपघातग्रस्त विमान दुपारी २.४० वाजता रडारवरून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी ऑस्प्रेचे आणखी एक विमान उत्तर ऑस्ट्रेलियात कोसळले होते. ऑगस्टमध्ये झालेल्या या अपघातात तीन अमेरिकन नौसैनिकांचा मृत्यू झाला होता.अपघातावेळी विमानात एकूण २३ जण होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top