ज्युरी निवडीला आव्हान देणारी ट्रम्प यांची याचिका फेटाळली

न्युयॉर्क
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या विविध आरोपांखाली न्यायालयीन खटल्यांना सामोरे जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी ज्युरींची निवड घाईघाईने व अन्याय पद्धतीने केल्यामुळे या फौजदारी खटल्याची सुनावणी काही काळ स्थगित ठेवण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी केली होती. वरिष्ठ न्यायालयाने आज ही मागणी फेटाळली.

न्युयॉर्कच्या वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायमूर्ती मार्शा मिशेल यांनी या संदर्भात ट्रम्प यांचे म्हणणे काही मिनिटे ऐकून घेऊन तातडीने त्यांची याचिका फेटाळली. यावेळी न्यायालयाने, ट्रम्प यांच्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला सोमवारपासून सुरू करण्याची विनंती मान्य केली. २०१६ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळात आपल्या विरोधातील बातम्या येऊ नयेत यासाठी ट्रम्प यांनी पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्या संदर्भात हा फौजदारी खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीला आता सोमवारपासून सुरुवात होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top