टाटा मॅरेथॉनसाठी रविवारी मध्य रेल्वेच्या २ विशेष लोकल

मुंबई- जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन- २०२४ ही स्पर्धा रविवार २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी मध्य रेल्वेने २ विशेष लोकल चालविण्याची घोषणा केली आहे.

टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार्‍या धावपटूंची वेळेवर पोहचण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे प्रशासन रविवारी पहाटे तीन वाजता कल्याण स्थानकातून सीएसएमटीसाठी विशेष लोकल सोडणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे.यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये जवळपास देशविदेशातील ५७ हजार धावपटू सहभागी होणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top