दाऊदला राज्य सरकारचा दणका! रत्नागिरीतील जमिनीचा लिलाव

रत्नागिरी – मृत्यूच्या बातमीने चर्चेत आलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला राज्य सरकार दणका देणार आहे. रत्नागिरीतील मुंबके येथील दाऊदच्या मालकीच्या जमिनीचा ५ जानेवारी २०२४ रोजी लिलाव करण्यात येणार आहे.
भारतातून फरार असलेला आणि १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम कासकर हा मूळचा कोकणातील आहे. रत्नागिरीतील मुंबके हे दाऊदचे मूळ गाव आहे. दाऊदने तस्करी, खंडणी आणि इतर बेकायदेशीर मार्गाने अमाप संपत्ती जमवली. त्यातून त्याने काही मुंबईसह विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. आता दाऊदच्या याच मालकीच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे.
रत्नागिरीतील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या ४ जागांचा लिलाव होणार आहे. यामध्ये ४ शेत जमिनींचा समावेश आहे. जवळपास २० गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. ४ जमिनीपैकी एका जमिनीची किंमत ९ लाख ४१ हजार २८० रुपये इतकी आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ही ८ लाख ८ हजार ७७० रुपये इतकी आहे. मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत २१ नोव्हेंबर२०२३ रोजी लिलावाबाबत नोटीस काढण्यात आली होती. या आधी ३ वर्षांपूर्वीदेखील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top