देशविदेशातील मांजरांचे कोल्हापूरकरात भव्य प्रदर्शन

कोल्हापूर – फिलाईन क्लब ऑफ इंडियाच्यावतीने शहरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये देशविदेशातील मांजरांच्या भव्य स्पर्धा आणि प्रदर्शन पार पडले. यावेळी या रूबाबदार पण मऊ लुसलुशीत मांजरांचे नखरे आणि अदा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.

सुमारे ३०० हून अधिक मांजरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.कोल्हापूरसह, बंगळुरू,बेळगाव,सोलापूर, मुंबई,पूणे,सातारा,सांगली जिल्ह्यातून मांजरप्रेमी सहभागी झाले होते. मांजराची निगा राखणे, गैरसमज यासह त्यांचे आरोग्य,लसीकरण,आहार याबाबत तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन या शोचे वैशिष्ट्य ठरले. विशेष म्हणजे मांजरे पाहण्यासाठी लहानग्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता.विशेष म्हणजे बेंगॉल कॅट म्हणजे चित्यासारख्या मांजरास पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.क्लासिक लाँग हेअर,बँगाल कॅट, मेनकुन,ब्रिटिश शॉर्ट हेअर, एक्झाटिक शॉर्ट कॅट, सॅबेरियन कॅट, सियामिस, ओरिवो,भारतीय जातीचे इंडी माऊ अशा विविध प्रजातींच्या मांजराचा यात समावेश होता.प्रामुख्याने पर्शियन,क्लासिक लाँग हेअर,बँगाल कॅट,मेनकुन, ब्रिटिश शॉर्ट हेअर, एक्झॉटिक शॉर्ट कॅट, सैबेरियन कॅट,सियामिस, ओरिवो,भारतीय जातीचे इंडी माऊ या प्रकारचे मांजर या शो मध्ये सहभागी होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top