नाशकात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी ठार

नाशिक :

जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात आज एक ३१ वर्षीय तरुणी ठार झाली. निशाणवाडी (त्रिंगलवाडी) येथे ही घटना घडली. या घटनेमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मीनाक्षी शिवराम झुगरे असे मृत तरुणीचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास तरुणीच्या घराबाहेर बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप मारली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. येथील रहिवाशी भागासह बिबट्या असलेल्या तालुक्याच्या सर्व परिसरात तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते सिताराम गावंडा यांच्यासह गावक-यांनी केली. वन याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top