परीक्षा अर्ज भरण्यासाठी खासगी विद्यार्थ्यांना मुदतवाढ

पुणे –

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फॉर्म नंबर १७ भरून दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. खासगी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाइनद्वारेच भरायचा आहे. कोणाचाही अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top