पश्चिम रेल्वेची सहावी मार्गिका जून महिन्यात सुरू होणार

मुंबई-

गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचा ४.७ किमीचा पहिला टप्पा लवकरच खुला करण्यात येणार आहे. यासाठी मालाड, कांदिवली रेल्वे स्थानकात मार्गिकेचे काम सुरू आहे. कांदिवलीपर्यंत जूनअखेर सहावी मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. तसेच १५ मेपर्यंत पश्चिम रेल्वेवर आणखी एसी लोकल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं उष्णतेच्या या दिवसांत प्रवाशांना गारेगार प्रवास अुनभवता येणार आहे. गोरेगाव-कांदिवलीदरम्यान रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यास आणखी वाढीव फेऱ्या सुर होणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव- कांदिवलीपर्यंतचा ४.५ किमी लांबीचा मार्ग जवळपास तयार आहे. तसेच, भूसंपादनाच्या काही तक्रारी दूर झाल्यास यावर्षी नोव्हेंबरपर्यंत बोरीवलीपर्यंत सहावी मार्गिका सुरू होऊ शकते. नोव्हेंबर 2023मध्ये खार ते गोरेगावपर्यंत सहावी मार्गिका सुरू झाली होती.

कांदिवलीदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेसाठी एकूण १२ पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी आठ रेल्वे पुलांचे काम पूर्ण झाले असून ४ पुलांचे काम पुढील महिन्यात पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सिग्नलिंगचे काम जवळपास ७० टक्के काम आणि ओव्हरहेड वायरचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. बोरीवली ते मुंबई सेंट्रलदरम्यान ३० किमीपर्यंतची सहावी मार्गिका तयार होत आहे. लोकल ट्रेन मेल-एक्स्प्रेसपासून वेगळ्या ठेवण्यासाठी पाचव्या व सहाव्या मार्गिका तयार करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top