पॅलेस्टाइन राष्ट्राच्या निर्मितीची शक्यता नेतन्याहूंनी फेटाळली

तेल अवीव
पॅलेस्टाईन या वेगळ्या देशाची निर्मिती होण्याची शक्यता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी फेटाळली आहे. या संदर्भात अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावाचाही त्यांनी विरोध केला आहे.
या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेच्या बायडन सरकारने दोन देशांच्या निर्मितीचा पर्याय दिला होता. या संदर्भात बुधवारी जाहीर झालेल्या एका अहवालाच्या संदर्भात बोलतांना नेत्यन्याहू यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. उपलब्ध असलेल्या वाळवंटाचा वापर करुन पॅलेस्टाईन या वेगळ्या देशाची निर्मिती होऊ शकते असेही अमेरिकेचे म्हणणे आहे. १९४७ साली संयुक्त राष्ट्रसंघानेही अशाच प्रकारच्या व्यवस्थेची सूचना मांडली होती. काही माध्यमे ही इस्रायलच्या आणि या युद्धाच्या प्रगतीबाबत चुकीच्या बातम्या पसरवत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इराण आणि हमास आपले सरकार पडून इस्रायलमध्ये मध्यावधी निवडणूका होण्याची वाट पाहात असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. पॅलेस्टाईन देशाची निर्मिती केल्याशिवाय इस्रायलला पूर्णपणे सुरक्षा मिळणार नाही असे मत अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केले होते. या साऱ्या प्रस्तावांना इस्रायलच्या पंतप्रधानांनी पूर्णपणे फेटाळले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top