प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी वाराणसीतून पूजेची भांडी

अयोध्या :

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी वाराणसीच्या काशीपूर भागात पूजेची भांडी तयार केली जात आहेत. वाराणसीच्या काशीपूर येथे राहणारे लालू वर्मा यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीसाठी महत्त्वाची भांडी तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये पाण्याचे पात्र, कमंडल, पूजा थाळी आणि शृंगी यांचा समावेश आहे. अशा १२१ भांड्याच्या सेटची ऑर्डर लालूंना देण्यात आली आहे. या तयारीसाठी ते रात्रंदिवस मेहनत करत आहेत.

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना लालू वर्मा म्हणाले की, ‘आम्हाला पितळी कमंडल, जर्मन-चांदीचे आचमन, जर्मन-चांदीची शृंगी आणि जर्मन-चांदीची ताष्टा (पूजा थाळी) तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. यासाठी आम्ही मागील १५ दिवसांपासून मेहनत घेत आहोत. १५ जानेवारीपूर्वी या सर्व गोष्टी तयार करून द्याव्या लागतील. मला विश्वास बसत नाही की माझ्या डोळ्यासमोर राम मंदिर बांधले गेले. त्यात रामलल्ला विराजमान होणार आहेत. हे काम करण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. ब्राह्मणांसाठी पाण्याची भांडे आणि इतर भांडी तयार केल्यानंतर श्री रामांसाठी चांदीची शृंगी देण्यात येणार आहे. या एका सेटची किंमत १२५० रुपये आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top