बिबट्याचा 4 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला

वाघोली : बुर्केगाव (ता. हवेली) येथील शेतामध्ये एका चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यानंतर तिला सोडून बिबट्या पळाला. या हल्ल्यात तिच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. तिला ससून रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास दत्तात्रय चौरे व कुटुंबीय गावठाणाच्या शेजारी शेतामध्ये काम करीत होते. तिथेच काही अंतरावर चार वर्षीय पुनम खेळत होती. तिचा अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने चौरे कुटुंबीयांनी त्या दिशेने धाव घेतली. बिबट्या तिला शेजारील उसात ओढत नेत असल्याचे दिसून आले. सर्वांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने तिला सोडून पळ काढला. या हल्यात तिच्या गळ्यावर, मानेवर, डोक्याला व पाठीला गंभीर जखमा झाल्या. तिला तातडीच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top