भूकंपामुळे जपानची जमीन सरकली

टोकियो :

जपानच्या पश्चिम भागात सोमवारी ७.६ रिश्टर स्केलचा भूंकप आला होता. या भूकंपामुळे जपानमधील नोटो क्षेत्राची जमीन भूकंपाच्या केंद्रापासून १.३ मीटरने पश्चिमेकडे सरकल्याचे जपानच्या भौगोलिक माहिती प्राधिकरणाने दिली. आता भूकंपांतील मृतांची संख्या ५७ वर पोहचली आहे. भूकंपामुळे उत्तर आणि वायव्य जपानच्या प्रमुख भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली होती. नोटो विमानतळावरील कार पार्कमध्ये सुमारे ५०० लोक अडकले होते. धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उड्डाणसेवा थांबवण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top