महिला आरक्षण विधेयक जनगणनेनंतर लागू होणार

  • अर्थमंत्री सीतारामन यांचे वक्तव्य

मंगळुरू
महिला आरक्षण विधेयकांची अंमलबजावणी करण्यासाठी २०२४च्या जनगणनेनंतर केंद्र सरकार लागू करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री येथे राणी अब्बाक्का यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन केल्यानंतर त्या बोलत होत्या. सीतारामन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रउभारणीत महिलांच्या योगदानावर नेहमीच विश्वास असल्यामुळे महिला विधेयक प्रत्यक्षात आले आहे. केंद्र सरकारने साम्राज्यवादी शक्तींविरुद्ध लढलेल्या अनेक अज्ञात सैनिकांच्या योगदानांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच कर्नाटकात किनारपट्टी परिसरातील राणी अब्बाक्का यांच्या नावाने सैनिकी शाळा उभारली जाणार आहे.
टपाल तिकिटावर असलेले राणी अब्बाक्का यांचे चित्र चित्रकार वासुदेव कामत यांनी काढले आहे. याबद्दल वासूदेव कामथ यांचे त्यांनी अभिनंदन केले. आझादी का अमृत महोस्तवाचा एक भाग म्हणून सरकारने १४,५०० कथांचा संग्रह असलेला डिजिटल जिल्हा भांडार तयार केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने अमर चित्र कथा या संस्थेशीही करार केला असून स्वातंत्र्यलढ्यातील महिलांची भूमिका, संविधान सभेतील महिला आणि स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी नेत्यांवरील तीन पुस्तके प्रकाशित केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top