मानवी मेंदूत चिप बसविण्या तटेस्ला समूहाच्या न्यूरालिंकला यश

वॉशिंग्टन

टेस्लाचे मालक तथा अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या टेस्ला समूहांतर्गत न्यूरालिंक या स्टार्टअपने मानवी मेंदूत शस्त्रक्रियेच्या माध्यमातून चिप बसविण्यात अखेर यश मिळविले आहे. ही चिप एका लहानशा नाण्याच्या आकाराची असून ती मानवी मेंदू आणि संगणकादरम्यान थेट संवाद प्रस्थापित करणार आहे. या चिपची (एक डिव्हाईस ) मानवी चाचणी अद्याप व्हायची आहे. ती यशस्वी झाली की, या चिपच्या माध्यमातून दृष्टिहीन लोक हे सुंदर जग बघू शकतील आणि अर्धांगवायूचे रुग्ण इतरांप्रमाणे चालू शकतील.

या चिपच्या माध्यमातून रुग्ण विचार करेल आणि त्याआधारे फोन, संगणकासह अनेक डिव्हाईसचे संचालन करू शकेल. दिव्यांगांसाठी हे संशोधन वरदान ठरणार आहे. सुरुवातीला त्यांच्यासाठीच ही चिप उपलब्ध करून दिली जाईल. ”कल्पना करा, महान शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग आज हयात असते तर या चिपच्या मदतीने डिव्हाईस हाताळू शकले असते, अशी भावना प्रयोगाच्या प्राथमिक यशानंतर मस्क यांनी व्यक्त केली. दरम्यान, सप्टेंबर २०२३ मध्ये मस्क यांना इंडिपेंडन्ट इन्स्टिट्युशनल रिव्ह्यू बोर्डाने या प्रयोगासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे न्युरालिंक आता लवकरच मानवी चाचणी सुरू करणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top