‘मिग-२१’ लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी

नवी दिल्ली

भारतीय वायुसेनेने ‘मिग-२१’ लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानात ‘मिग-२१’ कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे आता हवाई दलाने ‘मिग-२१’ विमानाचे उड्डाण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थानात ८ मे रोजी झालेल्या अपघाताची चौकशी वायुसेनेचे पथक करत आहे. ही चौकशी सुरू असेपर्यंत मिग-२१ चे विमानाचे तिन्ही स्क्वाड्रन उडणार नाही. मिग प्रकारांचा पहिला ताफा १९६३ मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आला होता आणि त्यानंतरच्या दशकात भारताने ७०० हून अधिक मिग-व्हेरियंट विमाने खरेदी केली होती. मिग हे भारतीय वायुसेनेचे सर्वात जुने फायटर जेट फ्लीट आहे. त्याच्या जागी संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ८३ तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत ४८ हजार कोटींचा करार केला आहे. दरम्यान भारतीय वायु दल ११४ लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला हवाई दलात समाविष्ट झाल्यापासून आतापर्यंत ४०० हून अधिक वेळा मिग-२१ विमानांचे अपघात झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top