Home / Top_News / योगी आदित्यनाथ यांची अकोल्यातील सभा रद्द

योगी आदित्यनाथ यांची अकोल्यातील सभा रद्द

अकोला अकोल्यातील भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार होती. आकोल्यातील...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

अकोला

अकोल्यातील भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार होती. आकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कसून तयारी केली होती. मात्र ही सभा अचानक रद्द करण्यात आली. सभा रद्द करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सभा अचानक रद्द करण्यात आल्याने भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. तसेच मुर्तिजापूर येथे आज दुपारी ४ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा देखील अचानक रद्द करण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या