वाड्रा-डीएलएफ करारात नियमांचे उल्लंघन नाही! अहवाल सादर

चंडीगड :

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई राॅबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्याविरुद्ध जमीन घोटाळा प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. मात्र या जमिनीच्या व्यवहारात कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही असा अहवाल तहसीलदारांनी सादर केला आहे.

राॅबर्ट वाड्रा आणि भूपिंदरसिंह हुड्डा यांच्याविरोधात दाखल प्राथमिक माहिती अहवालाशी (एफआयआर) संबंधित आपल्या तपासात हरयाणाच्या महसूल अधिकाऱ्यांना वाड्रा यांच्या स्कायलाइट हाॅस्पिटॅलिटीकडून डीएलएफला झालेल्या वादग्रस्त जमिनीच्या हस्तांतरणात काहीही गैरप्रकार आढळून आलेला नाही. हरयाणा पोलिस मात्र या करारादरम्यान झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी तपासत आहेत. डीएलएफला ३.५ एकर जमीन विकण्यात आली होती आणि या व्यवहारात कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले गेले नाही, असा अहवाल तहसीलदारांनी दिल्याचे हरयाणा पोलिसांनी तयार केलेल्या स्थितीदर्शक अहवालात म्हटले आहे. दरम्यान, फेब्रुवारी २००८ मध्ये शिकाेहपूर येथील वादग्रस्त ३.५ एकर जमीन ओंकारेश्वर प्राॅपर्टीजकडून स्कायलाईट हाॅस्पिटॅलिटीजने ७.५ काेटी रुपयांमध्ये खरेदी केली हाेती. व्यावसायिक परवाना मिळाल्यानंतर ही जमीन डीएलएफला ५८ काेटी रुपयांमध्ये विकण्यात आल्याचा आराेप आहे. या माेबदल्यात तत्कालीन हुड्डा सरकारने वजिराबाद येथील ३५० एकर जमीन डीएलएफला दिल्याचाही आराेप आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top