सहा एकर शेती विकून पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणीला सोने आभूषणे

पंढरपुर – समस्त महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठलाच्या एका भक्ताने विठ्ठल भक्तीतून आपली सहा एकर शेती विकून विठुरायासह रुक्मिणी मातेला साेन्याची आभूषणे अर्पण केली आहेत.धाराशिव जिल्ह्यातील बाई लिंबा वाघे या विठ्ठल भक्ताने स्वत:ची सहा एकर शेती विकून लाडक्या विठुरायाला १८ लाख रुपयांचा २५ तोळ्याचा सोन्याचा करदोडा आणि रुक्मिणीला दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले आहे.

बाई लिंबा वाघे यांची धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी या गावात २१ एकर शेती आहे.त्यांना वारसदार नसल्याने त्यांनी ७८ लाखाला सहा एकर शेती नुकतीच विकली आहे. शेती विकून आलेल्या पैशातून आपल्या लाडक्या विठुरायाला १८ लाख रूपयांचे २५ तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा तसेच रुक्मिणी मातेला दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले आहे.बाई लिंबा वाघे यांच्या विठ्ठलभक्तीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top