सांडपाणी मुक्त नदी! २६ जानेवारीपासून मोहिम

पुणे – सांडपाणी मुक्त, प्रदुषण मुक्त नद्यांचे महत्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने पुणे रिव्हर रिव्हायव्हल या ६० सामाजिक संघटनांचा सहभाग असलेल्या संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारीपासून राईट्स आॅफ रिव्हर्स ही सांडपाणी मुक्त नदी असा संदेश देणारी ही अनोखी मोहिम सुरू करणार आहे.२६ जानेवारी ते २८ जानेवारी असे तीन दिवस ही मोहिम चालणार आहे,अशी माहिती या मोहिमेत अग्रस्थानी असलेले संघटनेचे सदस्य संतोष लालवानी यांनी दिली.
मोहिमेअंतर्गत प्रथम भिमा खोऱ्यातील मुळा, मुठा, रामनदी,पवना, इंद्रायणी, भामा आणि भीमा या सात नद्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त नदी तज्ज्ञ परिणिता दांडेकर यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन केले जाणार असून आरजे संग्राम हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. मोहिमेची सांगता भारताचे पाणीदूत अशी ओळख लाभलेले राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
नद्यांच्या संरक्षणाचे महत्व सरकार आणि सर्वसामान्य नागरिकांना पटवून देणे आणि नद्या प्रदुषणमुक्त राखण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट्य आहे.या मोहिमेदरम्यान निवडलेल्या सात नद्यांमधून वेगवेगळ्या ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा केले जाणार आहेत. या नमुन्यांचे प्रयोगशाळेत परिक्षण करून त्यातील दुषित घटकांची भावी पिढी पर्यंत पोहोचविली जाणार आहे. त्यासाठी संघटनेच्या वतीने शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
या तीन दिवसीय मोहिमेमध्ये विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.त्यामध्ये २४ तासांचे सामुहिक लाक्षणिक उपोषण हा प्रमुख उपक्रम आहे.या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून नद्या वाचविण्यासाठी झालेल्या ७०० दिवसांच्या ऐतिहासिक साखळी उपोषणाचे स्मरण केले जाणार आहे. त्याचबरोबर सेल्फी विथ रिव्हर, नदी किनार्यांची साफसफाई, पथनाटय आणि कलेच्या माध्यमातून नद्यांच्या रक्षणाचा संदेश असे कार्यक्रम राबविले जाणार आहेत,असे लालवान यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top