हिंदू तरुणीचा सुटकेसमध्ये मृतदेह! मुंबईत पुन्हा लव्ह जिहाद?

मुंबई- मानखुर्द येथील साठे नगरात राहणाऱ्या आणि दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय अविवाहित हिंदू तरुणीचा मृतदेह उरण परिसरात एका सुटकेसमध्ये कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निजामुद्दीन अली नावाच्या तरुणासोबत ही तरुणी बेपत्ता झाली होती. आता तिची हत्या लव्ह जिहाद असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी आरोपी निजामुद्दीनला पोलिसांनी मानखुर्द येथून अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ही पीडित तरुणी मानखुर्द येथील साठे नगरात आई आणि भावासह राहत होती. ती सँडहर्स्ट रोड येथे घरकाम करत होती. चार वर्षांपासून तिचे नागपाडा येथील एका टॅक्सीचालक निजामुद्दीनसोबत प्रेमसंबंध होते. या प्रकाराची तिच्या कुटुंबियांना काहीही माहिती नव्हती. ही तरुणी 18 एप्रिलला कामासाठी घरातून बाहेर पडली, पण ती परतलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.पोलीस शोध घेत असतानाच उरण परिसरात गुरुवारी एका सुटकेसमध्ये या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तिच्या आई आणि भावाने तिचा मृतदेह ओळखला. तिच्या केसांना असलेली क्लिप, दोन बोटांमधील अंगठी आणि कपड्यांसोबत एक बांगडी आणि तिच्या दोन्ही हातांवर गोंदवलेली नावे यावरून तिची ओळख पटविण्यात आली.
पोलीस तपासात निजामुद्दीनचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याची धरपकड केली. त्याने चौकशीत आपला गुन्हा मान्य केला आहे. ही तरुणी धोका देत असल्याचा संशय त्याला आला होता. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता.18 एप्रिलला त्याने तिला जे जे हॉस्पिटलजवळ येण्यास सांगितले होते. ती तिथे आल्यानंतर तिला त्याने कल्याण खडवली नदी किनारी नेले आणि तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात कोंबून एका सुटकेसमध्ये भरला. सुटकेसमध्ये भरलेला मृतदेह उरणच्या चिरनेर येथे फेकून दिला.
निजामुद्दीन हा मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौ येथील असून, तो विवाहित आहे. त्याला दोन वर्षांचा मुलगाही आहे. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मानखुर्द येथील या पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी लोढा म्हणाले की, ही श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती असून अतिशय दुःखद घटना आहे. हिंदू बहिणींना फसवले जाते आहे. आमच्या भगिनींची कट्टरपंथीयांकडून निर्घृण हत्या केली जात आहे, हे अतिशय क्लेशदायक आहे. मालवणी, चेंबूर, अंधेरीनंतर आता आपल्या शहरातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे पोलिसांना याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बांगलादेशी, रोहिंग्यांच्या वाढत्या घुसखोरीमुळे असे प्रकार अधिक वाढीस लागले आहेत. मानखुर्दमध्ये असलेल्या सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकाम तोडून सरकारी जमीन मोकळी करा. बांगलादेशी, रोहिंग्यांसाठी विशेष शोधमोहीम राबवा, अशी आमची मागणी आहे. अन्यथा हिंदू तरुणी, महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाही. या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री, राज्य सरकारचा एक घटक म्हणून प्रयत्न करेन. 24 तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलन छेडले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top