९ आणि १३ ऑक्टोबरला मुंबईत पाणीपुरवठा बंद

मुंबई : मुंबईतील मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्‍या झडपा बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी सोमवार ९ आणि शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी ‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापराने असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

झडपा बदलीच्या कामातील पहिल्या टप्प्यात ९ ऑक्टोबर रोजी ९०० मिलिलिटर व्यासाचे ३ आणि ७५० मिलिलिटर व्यासाचा १ असे एकूण ४ व्हॉल्व बदलण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात १३ सप्टेंबर रोजी ९०० मिलिलिटर व्यासाचे २ आणि ७५० मिलिलिटर व्यासाचा १ असे एकूण ३ व्हॉल्व्ह बदलण्यात येतील. सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पी उत्तर विभागातील मालाड पूर्व, पी दक्षिण विभागातील गोरेगाव पूर्व आणि आर दक्षिण विभागामधील कांदिवली पूर्व येथील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर, लोखंडवाला, हनुमान नगर, वडार पाडा (१ आणि २) नर्सीपाडा आदी परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top