Home / Top_News / Bab el-Mandeb : होर्मुझनंतर मंडेबवर नजर; इराणची धमकी,जग चिंतेत

Bab el-Mandeb : होर्मुझनंतर मंडेबवर नजर; इराणची धमकी,जग चिंतेत

Bab el-Mandeb : इराणने होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) नंतर आता लाल समुद्रातील बाब-अल-मंदेब (Bab el-Mandeb) सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी...

By: Team Navakal
Bab el-Mandeb
Social + WhatsApp CTA

Bab el-Mandeb : इराणने होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) नंतर आता लाल समुद्रातील बाब-अल-मंदेब (Bab el-Mandeb) सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिल्याने जागतिक तेल पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आशिया आणि युरोपला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असून, Israel-Iran संघर्षात त्याचे सामरिक महत्त्व वाढले आहे.

United States आणि इस्रायलने इराणविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर तणाव अधिकच वाढला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदीनंतर इराणने बाब-अल-मंदेब मार्गावरही नियंत्रण ठेवण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना इराणने प्रतिकार अधिक तीव्र करण्याची भूमिका घेतली आहे.

‘या मार्गातून किती माल जातो?’ गालिबाफ यांचा सवाल, तणाव वाढला

Iranच्या संसदेचे अध्यक्ष Mohammad Bagher Ghalibaf यांनी शुक्रवारी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमधून लाल समुद्रातील बाब एल मंडेब (Bab el-Mandeb) सामुद्रधुनीबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी एडनजवळील या सामुद्रधुनीचा उल्लेख करत जागतिक पुरवठा साखळीवर त्याचे महत्त्व अधोरेखित केले. “जागतिक तेल, द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी), गहू, तांदूळ आणि खतांच्या वाहतुकीपैकी किती वाटा बाब एल मंडेब सामुद्रधुनीतून जातो?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यासोबतच, “या मार्गातून कोणत्या देशांना आणि कंपन्यांना सर्वाधिक पुरवठा होतो? किती देश या जलमार्गावर अवलंबून आहेत?” असेही प्रश्न गालिबाफ यांनी उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यामधून इराण जागतिक व्यापारातील या महत्त्वाच्या मार्गाकडे धोरणात्मक दृष्टीने पाहत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, या विधानामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या मध्यपूर्वेतील परिस्थितीत आणखी अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार ए-१० थंडरबोल्ट प्रकारचे एक विमान हवाई संरक्षण प्रणालीने पाडले, तर याआधी एफ-१५ प्रकारचे दुसरे विमान पाडल्याचा दावाही करण्यात आला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी या घटनेला फारसे महत्त्व नसल्याचे सांगत, युद्धात असे नुकसान होत असते, असे मत व्यक्त केले. तसेच यामुळे युद्धविराम चर्चेवर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, इराणने युद्धविरामाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सांगत अमेरिकेचे दावे फेटाळले आहेत.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान Benjamin Netanyahu यांनी इराणच्या औद्योगिक क्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणची पोलाद उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात घटल्याचे त्यांनी सांगितले.

मोक्याचा व्यापारी मार्ग : बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी

तांबडा समुद्र आणि एडनचा आखात यांना जोडणारा चिंचोळा जलमार्ग म्हणजे बाब-अल-मंदेब (Bab el-Mandeb) सामुद्रधुनी. अरबी भाषेत ‘बाब-अल-मंदेब’ याचा अर्थ ‘अश्रूंचे द्वार’ असा होतो.ही सामुद्रधुनी सुमारे १०० किलोमीटर लांब असून तिची रुंदी अंदाजे ३० किलोमीटर आहे. या मार्गाला जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे.Saudi Arabiaमधील यांबू बंदरातून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गे केली जाते. बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीतून तांबडा समुद्र ओलांडून पुढे सुएझ कालव्यामार्गे भूमध्य समुद्र गाठता येतो. यामुळे आशिया आणि युरोप खंडांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोक्याचा व्यापारी मार्ग मानला जातो. जागतिक तेल, वायू आणि इतर मालवाहतुकीसाठी या सामुद्रधुनीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते.

बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी कुठे आहे?; जागतिक व्यापारासाठी का महत्त्वाची

तांबडा समुद्र आणि एडनचा आखात यांना जोडणारा चिंचोळा समुद्रमार्ग म्हणजे बाब-अल-मंदेब (Bab el-Mandeb) सामुद्रधुनी होय. अरबी भाषेत ‘बाब-अल-मंदेब’ याचा अर्थ ‘अश्रूंचे द्वार’ असा होतो.

ही सामुद्रधुनी सुमारे १०० किलोमीटर लांब असून किमान रुंदी अंदाजे ३० किलोमीटर आहे. Saudi Arabiaमधील यांबू बंदरातून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गे केली जाते.

या सामुद्रधुनीतून तांबडा समुद्र ओलांडून पुढे सुएझ कालव्यामार्गे भूमध्य समुद्र गाठता येतो. त्यामुळे आशिया आणि युरोप खंडांना जोडणारा हा अत्यंत मोक्याचा व्यापारी मार्ग मानला जातो. या मार्गामुळे युरोपहून आशियाकडे येताना आफ्रिकेला वळसा घालण्याची गरज राहत नाही. तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूकही या मार्गातून मोठ्या प्रमाणात केली जाते.

दरम्यान, Iranकडून सागरी पातळीवर ही सामरिक चाल खेळली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या सैन्याने ‘वेव्ह ९३’ मोहीम सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत Israelमधील महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ले करण्यात येत आहेत. अलीकडील घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक तीव्र झाला असून, या संघर्षाचा परिणाम जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हे देखील वाचा –

नाशिक हादरलं! विहिरीत कार कोसळून 9 जणांचा करुण अंत; मृतांमध्ये 6 चिमुरड्यांचा समावेश

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला बक्षीस! इराणने जाहीर केले मोठे इनाम; F-15E लढाऊ विमान पाडल्याचा दावा

गॅस सिलिंडर महागला तरी टेन्शन नको! ‘या’ योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार 300 रुपयांची मोठी सूट

मेघेंच्या श्रद्धांजली सभेत देशमुख–परमबीर सिंह आमनेसामने

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या