Home / Top_News / पंतप्रधान मोदींनी ज्वाइन केले Truth Social, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीचा आहे हा प्लॅटफॉर्म

पंतप्रधान मोदींनी ज्वाइन केले Truth Social, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीचा आहे हा प्लॅटफॉर्म

PM Modi Joined Truth Social | सध्या भारतात अचानक ट्रूथ सोशल (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची चर्चा सुरू झाली...

By: Team Navakal

PM Modi Joined Truth Social | सध्या भारतात अचानक ट्रूथ सोशल (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची चर्चा सुरू झाली आहे. यामागचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या प्लॅटफॉर्मवर सहभागी झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे हा प्लॅटफॉर्म नेहमीच चर्चेत राहिला आहे. हा ट्रम्प मीडियाच्या मालकीचा प्लॅटफॉर्म आहे.

भारतीय पंतप्रधानांनी या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या पहिले दोन “ट्रुथ्स” शेअर करून पदार्पण केले. ट्रूथ हा शब्द या प्लॅटफॉर्मवरील पोस्टसाठी वापरला जातो. 

पंतप्रधान मोदींनी आपल्या पहिल्या “ट्रुथ” मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला व त्यांना “आपले चांगले मित्र” असे संबोधले आहे. त्यांनी पहिल्या पोस्टमध्ये लिहिले की, “ट्रुथ सोशलवर येताना आनंद वाटतो! येथे सर्व उत्साही व्यक्तींशी संवाद साधण्यास आणि आगामी काळात अर्थपूर्ण चर्चांमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे.”

त्यांनी या प्लॅटफॉर्मवर आणखी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन (Lex Fridman) यांच्यासोबतच्या तीन तासांच्या मुलाखतीची व्हीडिओ लिंक शेअर केली आहे.

ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्म काय आहे? (What is Truth Social)

ट्रुथ सोशल (Truth Social Platform), ज्याला TRUTH असे लिहिले जाते, हा एक जागतिक स्तरावर उपलब्ध सोशल असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. याची सुरुवात ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपने सुरू केली असून, त्यावर मुख्यतः डोनाल्ड ट्रम्प यांचा मालकी हक्क आहे. 

या प्लॅटफॉर्मची रचना आणि कार्यप्रणाली X ( ट्विटर) यासारखीच आहे. जानेवारी 2021 मध्ये यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटर आणि फेसबुकवरून बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल नावाने स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केला. 

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या