‘आर्टिकल ३७०’ चित्रपटावर आखाती देशांमध्ये बंदी

मुंबई
काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स या चित्रपटांप्रमाणे काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्याबाबतचे कथानक असलेल्या आर्टिकल ३७० या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या आर्टिकल ३७० हा चित्रपट जगातील एका मोठ्या बाजारपेठेत प्रदर्शित होत नसल्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.
आखाती देशांमध्ये भारतीय चित्रपट चांगला व्यवसाय करत असतात. या ठिकाणी भारतीयांची व इतर अशियाई देशांमधल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतरच्या काळात काश्मीर खोऱ्यांमध्ये घडलेल्या घडामोडींवर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. या चित्रपटात यामी गौतमी हिची महत्वपूर्ण भूमिका असून तिने या चित्रपटात एका गुप्तहेराची भूमिका बजावलेली आहे. ह्रतिक रोशन आणि दीपिका पडुकोणच्या फायटर या सिनेमालाही या आधी संयुक्त अरब अमिरात वगळता सर्वच आखाती देशांमध्ये बंदी घातली होती. त्यामुळे चित्रपटालाही मोठा आर्थिक फटका पडला होता. आता आर्टिकल ३७० या चित्रपटाला ही तसाचत फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top