‘स्क्विड गेम’च्या अभिनेत्याला विनयभंग प्रकरणी शिक्षा

सेऊल –
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजचे प्रसिद्ध अभिनेते ओह यंग सो याला कोरियाच्या न्यायालयाने एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ८ महिन्याच्या तुरुंगवास व २ वर्षांचे प्रोबेशन अशी शिक्षा सुनावली. याबरोबरच ओह यंग सो याला जेलमध्ये सेक्शुअल व्हायोलन्स ट्रीटमेंट प्रोग्राम दिला जाणार आहे.
२०१७ मध्ये ओ यंग सू यांच्यावर एका महिलेसोबत जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी २०२१ मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील पिडीत महिलेने सुवॉन जिल्हा अभियोक्ता कार्यालयाकडे या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. ओह यंग सोसोबत एका नाटकाच्या दौऱ्यावर जाताना त्याने तिचा विनयभंग केल्याची तक्रार तिने केली होती. या प्रकरणात अभिनेत्याला १० वर्षांचा तुरुंगवास आणि १५ दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र आता त्याला केवळ ८ महिन्यांचीच शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे ओह यंग सो याला स्क्विड गेम या त्याच्या गाजलेल्या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये काम करता येणार नाही. या बरोबरच दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक सेओक यांग यांचा बिग फॅमिली चित्रपटही त्याला सोडावा लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top