‘आयफोन १५’ खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबलचक रांगा

नवी दिल्ली- अ‍ॅपल कंपनीचा आयफोन-१५ हा आजपासून भारतात उपलब्ध झाला. आयफोनच्या खरेदीसाठी बहुतांश ग्राहकांनी प्री-बुकिंग केले होते. मात्र फोन खरेदीसाठी दिल्ली, मुंबईसह अन्य शहरातील अॅपल स्टोरमध्ये ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून आले.
अनेकजण रात्री १२ वाजल्यापासून रांगेत उभे होते. एका ग्राहकाने सांगितले की, तो तब्बल ११ तास रांगेत उभा होता. तरुणांबरोबर वयस्कर मंडळीही या रांगेत दिसत होती.मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील अ‍ॅपल स्टोअरसह देशभरातील अन्य प्रमुख शहरांतील मॉल आणि मोबाईल कंपन्यांच्या दुकानाबाहेर असे दृश्य पाहायला मिळत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top