Home / Uncategorized / नवीन नंबर प्लेट नसल्यास आता २ हजार रुपये दंड

नवीन नंबर प्लेट नसल्यास आता २ हजार रुपये दंड

नागपूर – प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेटची म्हणजेच एचएसआरपी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.येत्या ३० जूननंतर किमान ऑनलाईन नोंदणी...

By: Team Navakal

नागपूर – प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेटची म्हणजेच एचएसआरपी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
येत्या ३० जूननंतर किमान ऑनलाईन नोंदणी केल्याची पावती असल्यास दंडात्मक कारवाईतून सूट दिली जाईल.अन्यथा प्रत्येक वाहनाला प्राथमिक स्वरुपात २ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. त्यानंतरही एचएसआरपीची नोंदणी नसल्यास दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे.

शहरातील एचएसआरपी
कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्वच जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवून घेणे परिवहन विभागाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक आता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी धावपळ करीत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने आता तिसऱ्यांदा मुदत वाढ केली असून ३० जूनपर्यंत प्रत्येक वाहनाधारकाने किमान ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा मुदत संपल्यानंतर वाहनचालकांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एचएसआरपी नसल्यास वाहनचालकांकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. परिवहन विभागाकडून १ जानेवारी पासून सुरवात झालेल्या या प्रक्रियेला आता पाच महिन्यांचा कालावधी होत आहे. याकरिता आधी ३१ मार्च नंतर ३० एप्रिल आणि आता ३० जून अशी तीनदा मुदत वाढवून दिली. तरीही एचएसआरपी ऑनलाईन नोंदणी करण्यास वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या