रशियन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक 17 मार्चला

*पुतीन सलग पाचव्यांदा
राष्ट्राध्यक्ष होण्याची चर्चा

मॉस्को
रशियात पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीची रेलचेल सुरू झाली आहे. रशियन संसद ड्युमाच्या वरिष्ठ सभागृहातील फेडरेशन काऊन्सिलच्या सदस्यांनी या निवडणुकीचे मतदान 17 मार्चला घेण्याचे ठरवले आहे. ब्लादिमीर पुतिन सलग पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची चर्चा आहे.
पुतिन यांनी ही निवडणूक लढविणार नसल्याचे अद्याप तरी अधिकृतपणे जाहीर केले नाही. ते निवडणुकीबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. रशियाच्या राजकीय व्यवस्थेवर पुतिन यांची घट्ट पकड आहे. या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जातो. पुतिन यांना आव्हान देणारे त्यांचे बहुतांश प्रतिस्पर्धी सध्या तुरुंगात आहेत किंवा त्यातील काहींनी देशाबाहेर पलायन केले आहे. पुतिन यांनीच स्वतःची सत्ता कायम राहावी म्हणून राज्यघटनेमध्ये काही सुधारणा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना आणखी प्रत्येकी 6 वर्षांच्या दोन टर्म मिळू शकतात. तसे झाल्यास पुतिन 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top