सिंधुदुर्गातील सासोली गाव अंमली पदार्थ तस्करीचा अड्डा

सिंधुदुर्ग

गोव्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सासोली गावात अंमली पदार्थांच्या तस्करांनी अड्डे बनवले आहेत. हे गाव देशभरात अंमली पदार्थ वितरित करते, अशी माहिती वरिष्ठ पोलिसांच्या बैठकीत देण्यात आली. या तस्करांवर गुप्तचर यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अल्पावधीत सासोली हे गाव लोकप्रिय झाले आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी तस्करांनी या गावातील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. हे गाव गोव्याच्या मोपा विमानतळापासून अवघ्या १५ मिनिटांवर आहे. त्यामुळे इस्त्रायली, जर्मन नायजेरियन, रशियन लोक एलएसडी, एक्स्टेसी, कोकेनचा पुरवठा भारतातील विविध भागात करतात. येथील हे अंमली पदार्थ मुंबई, गोवा, दिल्ली, हैद्राबाद येथे पाठवले जातात. दरम्यान गोवा पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी ‘सीमेपलीकडून अमली पदार्थांची तस्करी’ या विषयावर सादरीकरण केले. त्यात सिंधुदुर्गातील अनेक कच्च्या रस्त्यांची गुप्त माहिती देण्यात आली. या भागात पोलिसांची गस्त अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तस्कर याच रस्त्याचा वापर तस्करीसाठी करतात. त्यामुळे सिंधुदुर्ग-गोव्या दरम्यानच्या सीमावर्ती भागात गस्त वाढवावी, असे पोलीस महासंचालकांच्या बैठकीत ठरले. त्याची माहिती तातडीने दोन्ही राज्यांच्या पोलिसांना देण्यात यावी, असेही सुचवण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top