Home / देश-विदेश / Air India : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड! सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Air India : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड! सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Air India : एअर इंडिआच्या विमानाचे याआधी अनेक किस्से झाले आहेत. या आधीची एअर इंडिआची दुर्घटना कोणीही विसरू शकत नाही....

By: Team Navakal
Air India
Social + WhatsApp CTA

Air India : एअर इंडिआच्या विमानाचे याआधी अनेक किस्से झाले आहेत. या आधीची एअर इंडिआची दुर्घटना कोणीही विसरू शकत नाही. आणि आता देखील सलग दोन दिवसांत एअर इंडियाच्या दोन वेगवेगळ्या विमानांमध्ये अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शेकडो प्रवाशांच्या जीवात जीव न्हवता. दिल्लीहून बेंगळुरूकडे जाणारे एक विमान तांत्रिक समस्येमुळे तातडीने भोपाळकडे रवाना करण्यात आले, तर दुसरीकडे सॅन फ्रान्सिस्कोहून दिल्लीला येणारे आंतरराष्ट्रीय विमान थेट मंगोलियाची राजधानी उलानबातारमध्ये उतरवले गेले. मात्र, दोन्ही ठिकाणी एअरलाइनच्या वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठ्या संकटावर मत करण्यात आली.आणि यात सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास दिल्लीहून बेंगळुरूकडे उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या ‘AI2487’ हे विमानाने तांत्रिक बिघाडामुळे अचानक डगमगायला लागले. विमानातील क्रूने कोणतीही जोखीम न घेता तातडीने विमान भोपाळ विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेतला.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हे विमान भोपाळ विमानतळावर सुरक्षित लँड करण्यात आलं. विमानात जवजवळ १५० हून अधिक प्रवासी होते. ते प्रवासी सुखरूप असून, त्यांची लगेच व्यवस्था करण्यात आली. एअरलाइनच्या प्रवक्त्यांनी या संधर्भात अधिक माहिती दिली की, “सुरक्षा हा आमच्यासाठी सर्वोच्च विषय आहे. विमानाची कसून तपासणी सुरू आहे शिवाय, प्रवाशांसाठी खानपान आणि दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली जात आहे.”

२ नोव्हेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्को येथून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या ‘AI174’ या विमानातसुद्धा हवेत असतानाच तांत्रिक समस्या उद्धवभली. क्रूने कोणतीही जोखीम न पत्करता हे विमान मंगोलियाची राजधानी उलानबातार येथे विमान उतरवण्यात आले. त्यानंतर सर्वप्रथम या विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. एअर इंडियाने आपल्या एक्स हान्डेलवर पोस्टमध्ये या संधर्भात अधिक माहिती दिली आहे.

एअर इंडियाने या दोन्ही घटनांमध्ये झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु ‘प्रवाशांच्या सुरक्षतेला आमचे प्रथम प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. यात प्रवाशांनी मात्र क्रूच्या संयमी वर्तनामुळे मोठा गोंधळ टळला असल्याचे सांगितले आहे. दोन्ही विमानांची सध्या सखोल तपासणी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या