Home / Uncategorized / अजित पवार जनाची नाहीतर मनाची तरी ठेवा ! विखे पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

अजित पवार जनाची नाहीतर मनाची तरी ठेवा ! विखे पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Minister Radhakrishna Vikhe Patil

धाराशिव – जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil)यांनी महायुतीतीलच घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar,)यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार जनाची नाही, तर मनाची तरी(self-respect,) लाज ठेवा, अशा शब्दांत विखे पाटलांनी हल्लाबोल केला.

धाराशिव जिल्हा (Dharashiv district)दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांना संबोधित करताना विखे पाटील यांनी साखर उद्योग व इथेनॉल धोरणाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah)यांनी इथेनॉल धोरण (ethanol policy)राबवून साखर कारखान्यांना जीवदान दिले. या नेत्यांचे फोटो तरी कारखान्याच्या बॅनरवर(factory banners)लावा, किंवा सभेत अभिनंदनाचा ठराव घ्या. जीवदान देणाऱ्यांचे फोटो लावले जात नाहीत, त्यांचे अभिनंदनही होत नाही. अजित पवार, जनाची नाही, तर मनाची तरी ठेवावी.

याच संदर्भात त्यांनी शरद पवारांवरही हल्ला चढवला. ते म्हणाले की, जाणता राजा म्हणवणाऱ्या शरद पवारांनी (Sharad Pawar)लोकांच्या घरात फोडाफोड केली, महाराष्ट्राला उपाशी (Maharashtra hungry.)ठेवण्याचे पाप केले.