Apple Fruits : दिवाळी सरली मात्र अवघ्या राज्यात सर्दी, खोकला, तापाचे सावट राज्यभरात पसरले आहे. त्यामुळे बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला असतो कि जास्तीत जास्त फळ खा जेणेकरून कुठलाही रोग तुमच्याकडे येणार नाही. खरं तर आपण लहानपणापासूनच हे ऐकत आलो आहोत कि सफरचंद असो किंवा पेर यांसारखी इत्यादी फळ आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात. सफरचंद आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं. पण आजकाल बाजारात केमिकल युक्त सफरचंद उपलबध असतात त्यामुळे आपल्यातील काही माणसं फळ घेणं टाळतात. बऱ्याचदा त्यावर चमक आणि ताजेपणा टिकवण्यासाठी वॅक्सचा वापर देखील केला जातो. हा वॅक्स आपल्या आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक असतो.

सफरचंदामध्ये व्हिटामिन सी, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, फॅट आणि कॅलरी असतात पण ते खाण्यापूर्वी योग्य पद्धतीने त्याला स्वच्छ करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ टाका आणि सफरचंद पाच मिनिटापर्यंत त्यात ठेवा मीठ त्यावरील अतिरिक्त घाण आणि केमिकल काढायला मदत करते. थोडं गरम पाणी घेऊन सफरचंद दोन ते तीन मिनिटांसाठी त्यात बुडवून ठेवा नंतर ते बाहेर काढून स्वच्छ कापडाने पुसा.

पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस देखील तुम्ही टाकून शकता. त्यानंतर सफरचंद दहा मिनिटं ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन नीट पुसा. असं केल्याने सफरचंदावरील केमिकल पूर्णपणे निघून जाते तसेच हानिकारक रसायनं निघून जातात आणि तुम्ही ते निर्धास्तपणे खाऊ शकता.
हे देखील वाचा – OTT Releases : Family Man 3 ते Stranger Things… नोव्हेंबर महिन्यात OTT वर येणार ‘हे’ 10 मोठे चित्रपट-सिरीज









