Home / Uncategorized / Bharat band : केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांविरोधात उद्या ‘भारत बंद’? काँग्रेससह विविध संघटनांचा सक्रिय पाठिंबा

Bharat band : केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांविरोधात उद्या ‘भारत बंद’? काँग्रेससह विविध संघटनांचा सक्रिय पाठिंबा

Bharat band : केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांच्या विरोधात संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या जाचक सुधारणांमुळे कामगारांचे...

By: Team Navakal
Bharat band
Social + WhatsApp CTA

Bharat band : केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांच्या विरोधात संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या जाचक सुधारणांमुळे कामगारांचे शोषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी देशातील प्रमुख दहा कामगार संघटनांनी उद्या, गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या आंदोलनाला शेतकरी संघटनांनंतर आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनेही आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला असून, उद्याच्या बंदमध्ये काँग्रेस आक्रमकपणे उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने कामगार कायद्यात जे बदल सुचवले आहेत, त्यामुळे कामगार वर्गासमोर रोजगाराच्या सुरक्षेचे आणि हक्कांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. नव्या सुधारणांमुळे कामगारांच्या कायदेशीर हिताला बाधा पोहोचणार असून, रोजगाराच्या संधींमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे धोरण भांडवलदारांच्या फायद्याचे आणि कष्टकरी वर्गाचे खच्चीकरण करणारे असल्याची टीका कामगार नेत्यांकडून केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बंदमध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रातील भाजपा सरकारचे धोरण हे पूर्णतः शेतकरी आणि कामगार विरोधी असल्याने, लोकशाही मार्गाने या अन्यायाचा प्रतिकार करणे आवश्यक असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) ऍड. गणेश पाटील यांनी या संदर्भात अधिकृत माहिती देताना सांगितले की, “कामगारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. पक्षाच्या आदेशानुसार, उद्याच्या बंदमध्ये स्थानिक पातळीवर सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करावा.” या बंदमुळे राज्यातील औद्योगिक वसाहती आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या