Home / Uncategorized / Bigg Boss ended: बिग बॉस शो मध्येच बंद..स्पर्धकांचं काय झाल??

Bigg Boss ended: बिग बॉस शो मध्येच बंद..स्पर्धकांचं काय झाल??

Bigg Boss ended: बिग बॉस (bigg boss) हा सगळ्यात लोकप्रिय रियालिटी शो म्हणून प्रसिद्ध आहे. अशात मनोरंजन (entertainment) विश्वातून एक...

By: Team Navakal
Bigg Boss ended

Bigg Boss ended: बिग बॉस (bigg boss) हा सगळ्यात लोकप्रिय रियालिटी शो म्हणून प्रसिद्ध आहे. अशात मनोरंजन (entertainment) विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस कन्नड’ (bigg boss)हे बंद करण्यात आले आहे. ‘बिग बॉस कन्नड’ या शोचे शूटिंग ज्या स्टुडिओमध्ये सुरू होत, तो स्टुडिओ बंद करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (केएसपीसीबी) दिले आहेत.

सध्या ‘बिग बॉस कन्नड 12’ सुरू होत. ‘बिग बॉस कन्नड 12’ चा स्टुडिओ बंगळुरू दक्षिणमध्ये बिदाडी इथे स्थित होता. पर्यावरणा संदर्भात नियमांचे उल्लंघन होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे अशी प्राथमिक माहिती आहे. केएसपीसीबीने (KSPCB) जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, वेल्स स्टुडिओज आणि एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड येथे सुरू असलेले प्रोजेक्ट तात्काळ बंद करण्यात आला. तसेच तेथिल परिसराला सील करण्याचे आदेश दिले आहेत.

‘बिग बॉस कन्नड 12’ चे होस्टिंग किच्चा सुदीप हे करत होते. या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना बंगळुरू इलेक्ट्रिसिटी कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस कन्नड’ सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

या परिसराचा वापर मोठ्या प्रमाणावर मनोरंजन आणि स्टुडियोच्या संचालनासाठी केला जात होता. मात्र त्यासाठी पाणी प्रदूषण आणि हवा प्रदूषणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे येथील कामकाज बंद करण्यात आले आहे.


हे देखील वाचा –

Dagdusheth Trust : दगडूशेठ गणपती ट्रस्टकडूनपूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या