Home / Uncategorized / BMC Election 2026 Eknath Shinde Voting : ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या तीन पिढ्यांचे एकत्रित मतदान-प्रत्येक मत शहराच्या भवितव्याचा कणा

BMC Election 2026 Eknath Shinde Voting : ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या तीन पिढ्यांचे एकत्रित मतदान-प्रत्येक मत शहराच्या भवितव्याचा कणा

BMC Election 2026 Eknath Shinde Voting : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहरात कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे...

By: Team Navakal
BMC Election 2026 Eknath Shinde Voting
Social + WhatsApp CTA

BMC Election 2026 Eknath Shinde Voting : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहरात कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे आणि पुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते. सकाळच्या वेळेत त्यांनी शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात मतदान केले. ठाणे शहर हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय बालेकिल्ले मानले जाते. या बालेकिल्ल्याची पकड कायम राखण्यासाठी त्यांनी प्रचारादरम्यान विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे त्यांच्या मतदानाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागून राहिले होते.

मुंबईसह ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्रितपणे निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नवी मुंबई तसेच राज्यातील काही इतर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील वातावरणाबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, सर्वत्र सकारात्मक वातावरण असून नागरिक मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडलेले दिसत आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा असून तो कुणीही हिरावून घेऊ नये, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, प्रत्येक मताचे मोल फार मोठे असते. शहराचा विकास, प्रशासनाची दिशा आणि भावी पिढ्यांचे भविष्य ठरवण्यात मतदानाची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोणत्याही दबावाशिवाय, निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या