Home / Uncategorized / जम्मू-काश्मीरला राज्य दर्जा विधेयक अधिवेशनात आणा! राहुल गांधी- खरगेंचे पत्र

जम्मू-काश्मीरला राज्य दर्जा विधेयक अधिवेशनात आणा! राहुल गांधी- खरगेंचे पत्र

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनातच विधेयक आणावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व...

By: Team Navakal
Rahul Gandhi on Maharashtra Elections


नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनातच विधेयक आणावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. या बरोबरच लडाख ला संविधानाच्या सहाव्या सूचीत सामील करुन घेण्यासाठीही विधेयक आणण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात अनेक केंद्रशासीत प्रदेशांना राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. तुम्ही स्वतःही अनेकदा जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येईल, असे विधान केलेले आहे. १९ मे २०२४ रोजी भुवनेश्वर येथे दिलेल्या एका मुलाखतीतही तुम्ही याचा पुनरुच्चार केला होतात. त्यानंतर १९ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीनगर येथील रॅलीत बोलतानाही तुम्ही राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन सर्वोच्च न्यायालयातही देण्यात आले होते. त्यामुळे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात या विषयीचे विधेयक आणून जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा व लडाखला संविधानाच्या सहाव्या सूचीत सामील करण्यासाठी विधेयक आणावे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या